पोलीस प्रवाह न्युज
पुणे, दि. १७- आगरी समाज प्रतिष्ठान, पुणे जिल्हा आयोजित भव्य समाज मेळावा, विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच आकर्षक खेळ पैठणी कार्यक्रम हा आज संत तुकाराम नगर येथील विरंगुळा केंद्र येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
समाजातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले प्रफुल्ल म्हात्रे यांनी खेळ पैठणीची रंगतदार सादरीकरण करून उपस्थित महिला भगिनींना मनसोक्त आनंद दिला. उत्कृष्ट सूत्रसंचालन उपसचिव श्री सुशांत पाटील यांनी करताना सर्वांची मने जिंकली.
प्रमुख पाहुण्यांच्या मान्यवर उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आगरी कवी पुंडलिक म्हात्रे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मंदार चवरकर, चित्रकार मोरेश्वर पाटील, संस्थेचे अध्यक्ष अनंत मेहेर, सचिव संतोष देविदास म्हात्रे, खजिनदार रमेश तुणतुणे, कार्याध्यक्ष राजेश बैकर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे नियोजन, हॉलची व्यवस्था प्रदीप पारंगे, रमेश मोरे यांनी अत्यंत सुबकपणे पार पाडले. सर्व कार्यकारणी सदस्यांनी मनापासून परिश्रम घेतल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम भव्यदिव्य झाला.
विरंगुळा केंद्रात पार पडलेला समाज मेळावा, विद्यार्थी सत्कार आणि खेळ पैठणी हा त्रिवेणी संगम कार्यक्रम उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. सर्वांचे मनःपूर्वक आभार!


































