पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २५- डॉ. राजनीश कामत यांनी स्वीकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार दि. २५ मार्च २ रोजी मा. राज्यपाल महोदयांच्या आदेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे मा. कुलगुरू कर्नल प्रा. डॉ. कारभारी काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. राजनीश कामत यांच्याकडे सुपूर्द केला.
या छोटेखानी कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी माजी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.




































