पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १५- जन पहारा मराठी वृत्तपत्र व महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजचे सहसंपादक राजू महादेव रिकामे यांना जन आरोग्य जीवन सोसायटी तर्फे “आदर्श पत्रकार पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नालासोपारा येथे झालेल्या जन पहारा मराठी वृत्तपत्राचा वर्धापन दिन समारंभ प्रसंगी हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते राजू रिकामे यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
या वेळी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी सांगितले की, “ राजू रिकामे यांनी प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे पत्रकारिता करत समाजातील वास्तव मांडण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा उपयोग व मार्गदर्शन भावी पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरेल.” कार्यक्रमात सत्यनारायण पूजा व महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला स्थानिक मान्यवर, पत्रकार बंधू, समाजसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिकामे यांच्या या सन्मानामुळे पत्रकार संघटनांत आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.




































