पोलीस प्रवाह न्यूज
करमाळा : दि. २७ – मा.शिवसेना उपजिल्हाप्रमुख व करमाळा तालुक्यातील ठाकरेंचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळख असलेले शाहूदादा फरतडे यांचे चिरंजीव शंभूराजे फरतडे यांची पुन्हा एकदा करमाळा युवासेना तालुकाप्रमुख पदी निवड झाली आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘दै. सामना’ मधून ही निवड जाहीर करण्यात आली आहे.
२०२२ मध्ये मूळ शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक आमिषांना लाथाडून फरतडे कुटुंबाने ठाकरे गटाला साथ दिली. युवासेना तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी मिळताच त्यांनी भव्य मशाल रॅली काढून शिवसेनेला मिळालेल्या मशाल चिन्हाचे स्वागत केले होते. युवासेना तालुकाप्रमुख म्हणून काम करताना शंभूराजे फरतडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन नवीन युवकांना पक्षात जोडले ,रस्ते, वीज, शिक्षण या विषयांवर अनेक आंदोलने केली .ऊस वाहतूकदार शेतकरी व उत्पादकांसाठी यशस्वी लढा उभारला , कर्जमाफी, वीज बिल माफी यासाठी आक्रमक आंदोलने केली.
EVM हटाव साठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले
– रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, शालेय साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना टोपी वाटप असे समाजोपयोगी उपक्रम राबवले. शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत ऐंशी टक्के समाजकारणाचा संदेश जोपासत त्यांनी काम केले आहे.शिवसेना पक्ष व ठाकरे परिवारावर निष्ठा ठेवून वाटचाल करत असताना पक्षाने शंभूराजे फरतडे यांना पुन्हा एकदा तालुकाप्रमुख पदावर काम करण्याची संधी दिली आहे.सर्वांना सोबत घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने संघटन वाढीसाठी काम करणार असल्याचा विश्वास फरतडे यांनी व्यक्त केला.










































