पोलीस प्रवाह न्युज
सिद्धनेर्ली, दि. २४- कुमार व कन्या विद्या मंदिर, सिद्धनेर्ली शाळेमध्ये स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मोफत ‘दंतचिकित्सा शिबीराचे’ आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि ग्रामस्थांच्या उस्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या संपन्न झाले.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी या शिबीरासाठी सीपीआर (CPR) कोल्हापूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. यामध्ये डॉक्टर अमोल लाहोटी (हेड ऑफ द डिपार्टमेंट), डॉक्टर स्वप्निल मगदूम, डॉक्टर मुस्कान जमादार या डॉक्टरांच्या पथकाने शिबीरात उपस्थित विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या दातांची मोफत तपासणी करून त्यांना योग्य आरोग्यदायी सल्ला व मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रशासक दत्तात्रय पाटील, कृष्णात मिळतील, वाय. बी. पाटील यांच्यासह इतर अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी आरोग्यविषयक जनजागृतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक मेटील, संतोष पाटील, विवेक पोतदार तसेच सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शिबीराचा सिद्धनेर्ली परिसरातील असंख्य विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी लाभ घेतला. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी निरोगी दातांचे महत्त्व पटवून देत या शिबीराची यशस्वी सांगता झाली.













































