पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. समाजातील अनेक घटक विविध राजकीय पक्षांना आपला पाठिंबा देत आहेत. तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या मोर्बा जिल्हा परिषद गटात कुणबी समाज सेवा संघ विभाग मढेगावने शिवसेना पक्षाचे उमेदवार रमेश मोरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
पाठिंबा पत्रात असे म्हणण्यात आले आहे की, बाविसी विभागातील २२ गावांमधील भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यसम्राट मंत्री भरत गोगावले यांच्या माध्यमातून करण्यात आला रह. सदैव त्यांनी समाजाला मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांच्या माध्यमातून विभागात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या रायगड जिल्हा परिषद आणि माणगाव पंचायत समिती निवडणुकीसाठी मंत्री गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील खंबीर नेतृत्वाला शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी देण्यात आली आहे. मोर्बा जिल्हा परिषदेचे रमेश मोरे व वडवली पंचायत समितीसाठी ज्ञानदेव पदरत निवडणूक लढवित आहे. कुणबी समाज सेवा संघ, बाविसी विभागाने या दोन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. समाजाची एकजूट हीच आपली शक्ती आहे. आपल्या हक्काच्या माणसांना निवडून देऊन विकासकामांचा हा रथ असाच पुढे नेण्यासाठी सर्वानी कंबर कसली पाहिजे. समाजहितासाठी आणि विकासाच्या पाठीशी, बाविसी विभाग एकवटलाय आपल्या माणसांच्यासाठी या धोरणाखाली येत्या ७ फेब्रुवारीला अमूल्य मतदानाचा हक्क बजावत दोन्ही शिवसेना उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन या जाहीर पाठिंबा पत्रकात करण्यात आले आहे.



































