पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १- तालुक्यातील उतेखोल येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदिर येथे ‘चॅरिझन फाउंडेशन’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आर. ओ. वॉटर फिल्टर भेट स्वरूपात देण्यात आला आहे. या कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन एन. एस. रंधावा यांनी उपस्थित राहून “उत्तम माणूस कसे बनावे” यावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी क्वालिटी हेड सचिन वाघ यांनी वाचनाचे फायदे सांगितले, तर उपाध्यक्ष सतीश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या मुलांनी ‘वीरता’ विषयावर अत्यंत प्रभावी कविता सादर केली.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे अध्यक्ष लक्ष्मण जंगम व मुख्याध्यापक अमोल जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. आभार प्रदर्शन सविता निंबाळकर यांनी केले. चॅरिझन फाउंडेशनच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे




































