पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १४- तालुक्यातील दहिवली गावचा पहिली वकील होण्याचा मान संकेत लता प्रकाश देवळेकर यांने पटकाविला. त्यांचे तालुक्यात सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
संकेत देवळेकर ह्याचे वडिलांनी स्व:ताच दुकान संभाळून मुलांना शिक्षण दिले. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व असून त्यांनी अथक मेहनत घेऊन संकेतला शिक्षण दिले. संकेतला सामाजिक क्षेत्रातील खुप आवड आहे. तिचे प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी पर्यंत दहिवली गावी झाले. यापुढील त्याचे शिक्षण आठवी ते दहावी पर्यंत टि. एस. भोस्तेकर माध्यमिक विद्यालय दहिवली पुढचे शिक्षण आकरवी ते पंधरावी अशोकदादा साबळे विद्यालय व जुनिअर कॉलेज माणगाव येथे झाले. यापुढील पदवीचे शिक्षण त्याने अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय माणगाव येथे वकिली पदवीसाठी प्रवेश घेऊन ३ वर्षाच्या वकिली अभ्यासक्रमानंतर यशस्वी होऊन त्याने आपल्या दहिवली गावचा पहिली वकील होण्याचा मान पटकाविला.


































