पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १०- संपूर्ण रायगड जिल्ह्यासह माणगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असले तरी रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांनी माणगाव तालुक्यावरील प्रेम कमी केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांनी महिला बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या माध्यमातून विकास कामांचे भूमिपूजन आणि काही ठिकाणी लोकार्पण सोहळा तर काही ठिकाणी नवीन सदस्यांना पक्षात नवी उमेद मिळावी याकरीता अनेक नव पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये नव्या उमेदीचे लहाने सुरव गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते दिलीप लहाने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अप) च्या माणगाव तालुका सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे खरवली पंचक्रोशीतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. आनंदाचे वातावरण आहे. लहाने सुरव आणि आणि जाधव सुरव ह्या गावातील ग्रामस्थांनी दिलीप लहाने यांचे अभिनंदन केले आहे.
दिलीप लहाने यांचे कार्य खरवली विभागात तुफान आहे. दिलीप लहाने यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधे दिवस काढले. मात्र ते खासदार सुनिल तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी लहाने सुरव, जाधव सुरव, आणि खरवली पंचक्रोशीतील एकूण एक गाव पिंजून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचे प्रयत्न केले. त्याचीच पोचवपावती म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांना दिलीप लहाने यांची माणगाव तालुका सहसचिव पदी नियुक्ती केली आहे. तशा आशयाचे नियुक्तीपत्र खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते दिलीप लहाने यांना प्रदान करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना वाढीसाठी मी इमाने इतबारे काम करुन पक्ष संघटना माझ्या विभागात कशी वाढेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत दिलीप लहाने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.





































