पोलीस प्रवाह न्युज
चिंचवड, पुणे- ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेले राष्ट्रभक्ती महाकविसंमेलन व रक्तदान शिबिर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि पोलीस खात्यातील अधिकारी तसेच राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी डॉ. लक्ष्मण शिवणेकर हे प्रमुख अतिथी होते. चिंचवड-चिखली जाधववाडी येथील श्री संत सावता महाराज मंदिराच्या सभामंडपात रक्तहितवर्धिनी सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रभक्ती महाकविसंमेलन आणि रक्तदान शिबिराचे आयोजन १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.
जन्माष्टमी (दहीहंडी) आणि भारताचा स्वातंत्र्य दिवस या पवित्र पर्वप्रसंगी आयोजित देशभक्ती (कर्मयोग), ईश्वरभक्ती (भक्तियोग) आणि ज्ञानभक्ती (ज्ञानयोग) यांचा सुरेख संगम झाल्याचा प्रत्यय आला असल्याचे प्रशंसोद्गार संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांनी काढले. शेवटी गझल सादर करून आनंद व्यस्त करताना आयोजक ॲड. रमेश अण्णा उंबरगे, नितीन चिलवंत , शिवकुमार बायस आणि सहकार्-यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. कार्यक्रमाची सुरुवात गौमातेचे पूजन, संत सावता महाराज, संत बसवन्ना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीना पुष्पहार अर्पण करून सामुदायिक शिववंदनेने झाली. डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांनी दहीहंडीच्या निमित्ताने गोमातेचे पूजन करून ग्रंथहंडी साजरी करून ज्ञानभक्तीचा संदेश दिला. संत तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि संतवचन ग्रंथ या पवित्र ग्रंथांची टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.मान्यवर वारकरी संप्रदाय तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते आयोजकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कारगिल विजय दिन, ऑगस्ट क्रांती दिन, स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वर्ष सुवर्ण महोत्सवी जन्म वर्ष आणि संत तुकाराम महाराज ३७५ वा वैकुंठ गमन वर्षानिमित्त देशभक्तीचा स्फुल्लिंग मनामनात जागवणारी काव्यपुष्पे अर्पण करण्यात आली.
दिवसभर मुक्तपणे चाललेल्या या सुंदर कार्यक्रमात कवींनी देशभक्तीपर तसेच ईश्वरभक्तीपर गीतगायन व कवितावाचन २०० कवींनी केले. यातून देशातील परिस्थितीचे भान दर्शवणाऱ्या ज्ञानवर्धक ग्रंथांचे ग्रंथहंडीच्या माध्यमातून वितरण करण्यात आले . सहभागी कवी, वारकरी भक्त व रक्तदात्यांना पाहुणे आणि दिवानआप्पा अंबुरेसर यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रमाणपत्र आणि राष्ट्रपुरुषांचे ग्रंथ भेट देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली.




































