पोलीस प्रवाह न्युज
कोल्हापूर, दि. २७- पंचाल सोनार समाजाच्या प्रगतीसाठी आणि एकजुटीला बळकटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून समाजाचे वधू वर ई-बुक दि. २६ जून रोजी समाजातील जेष्ठ व्यक्ती अरुण नांद्रेकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तरुणवर्ग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन समारंभात ई-बुकचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. या ई-बुकमध्ये समाजातील वधू-वरांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे समाजातील विवाह जुळवणी प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होणार आहे. यामुळे समाजातील सदस्यांमध्ये परस्पर संपर्क वाढेल आणि नव्या पिढीसाठी योग्य जीवनसाथी शोधणे सोपे होईल.
तसेच समाजातील सर्व विवाह इच्छुक वधू-वरांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी आवाहन करण्यात आले. इच्छुक वधू वरांनी आपली माहिती नोंदवण्यासाठी दिलेला फॉर्म भरून सहकार्य करावे, असे नम्र विनंती करण्यात आली. अधिकाधिक नोंदणी झाल्यास ई-बुक अधिक प्रभावी व उपयुक्त ठरेल, असेही अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष अनिल पोतदार (हुपरीकर), संचालक प्रकाश कबुरे, सुदर्शन पोतदार, दिपक औंधकर, प्रमोद पोतदार, विवेक पोतदार(सिद्धनेर्ली), संजय दैठणकर, शितल पोतदार, संदीप औंधकर, अनिस पोतदार, संदेश पोतदार आणि ई-बुकचे समन्वयक अक्षय बुचडे उपस्थित होते.











































