पोलीस प्रवाह न्युज
तळा, दि. १६- सन२०२५/२६चे शालेय शिक्षण वर्ष १६ जुन रोजी सुरू झाले असून नवागत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्राथमिक शाळांमधून दर्जेदार शिक्षण दिले जात असून उच्च विद्या विभूषित शिक्षक शिक्षण देत आहेत. तळा केंद्रीय शाळा दगडीशाळा मधील शिक्षकअनेक मुलांना घडवून नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा, मंथनराज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा, रायगड टायलेंट सर्च परीक्षा, डॉ.होमी भाभा विज्ञान परीक्षा, स्पर्धा परीक्षा घेऊन विद्यार्थी घडवले. ६ वर्षात जवळपास ५० विद्यार्थी यशस्वी झाले. घसरलेली पटसंख्या वाढवण्यास यशस्वी होत आहेत. याचा अभिमान वाटतो शैक्षणीक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जवळपास १०० विद्यार्थी संख्या असून काही प्रतिक्षेत आहेत. एक वाढीव शिक्षक दिला जाईल. शालेय शिक्षणा बरोबर क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन खाजगी शाळांकडे जाणाऱ्या पालकांचा ओढा या शाळेकडे आलेलादिसून येत आहे. याचे सर्व श्रेय सहकारी व सुनील बैकर उपशिक्षकांचे असून तळा दगडी शाळा केंद्रीय शाळेचे नांव जिल्ह्यात नांव लौकिक प्राप्त केला आहे. असे गौरवोद्गार नवागत विद्यार्थी प्रवेशोत्सवा प्रसंगीविद्यार्थी मार्गदर्शन करताना काढले.
त्यापुढे म्हणाले की शासनाने मोफत शिक्षण, विद्यार्थी गणवेश, पाठ्यपुस्तके शालेय साहित्य, क्रीडा साहित्य, मध्यान्ही शालेय पोषण आहार दिला जातो. पालकांना आवाहन करेन की, जसं आपण आपल्या पाल्याचा प्रवेश घेतला. तसा इतर पालकांना बैकर सरांच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी विनंती करावी. यावेळी विचार मंचकावर संतोष शेडगे उपशिक्षणाधिकारी भास्कर गोळे शालेय समिती अध्यक्ष, वेदिका गोरिवले उपाध्यक्ष प्रियंका जामकर मुख्याध्यापिका, किशोर पितळे पत्रकार, नरेश सुर्वे नगरसेवक, ऍड. बोडके सर, शिरसाटसर,खंडागळे सर, साधन व्यक्ती उपस्थित होते. यावेळी शेडगे यांनी सुनील बैकर, प्रियंका जामकर, मितल वावेकर, माडी मॅडम गुरव मॅडम यांचा सत्कार केला व उपस्थित मान्यवरांचे हस्तेगणवेश, पाठ्यपुस्तके गुलाब पुष्प देऊन स्वागतकेले. यावेळी पालक उपस्थित होते.



































