पोलीस प्रवाह न्युज
जोगेश्वरी, दि. २४- पोलीस ठाणे हददीत दिनांक १६ सप्टेंबर रोजी एक बांग्लादेशी नागरीक येणार असल्याची माहिती जोगेश्वरी पोलीस ठाणे येथील एटीसी पथक यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली असता एटीसी पथकाने सदरची माहिती मा वरीष्ठ पोलीस निरीक्षक इक्बाल शिकलगार यांना दिली. त्याप्रमाणे एटीसी पथक यांनी सापळा रचून एमएमआरडीए कॉलनी समोर, जोगेश्वरी पूर्व मुंबई येथून संशयीतास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सलीम बलाई मोल्ला, वय-३८ वर्षे, व्यवसाय इलेक्ट्रीशन, रा.ठी. व्हीसर (प), मुंबई असे सांगून त्याचे मूळगांव रा. ठि. ग्राम पोस्ट-सुकताग्राम, ठाना-कालिया, जिल्ल, बांग्लादेश असे चौकशीत सांगितले. नमुद इसमाकडे युक्ती प्रयुक्ती त्यास विश्वासात घेतली असता त्याचे मार्फतीने दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी भारतात अवैधरित्या वास्तव्य करणा-या आणखी चार नागरीकांना ताब्यात घेण्यात आले आहे. १) मन्नू अलेक शेख, वय-३२ वर्षे, २) रूखसाना मन्नू शेख वय ३० वर्षे, ३) मेहेक बन्नू शेख वय ०९ वर्षे, ४) मरीयमसोफी वय ०५ वर्षे सर्व राह. पत्ता रा. ठी. मीरारोड पूर्व, जिल्हा- ठाणे. मुळगांव पत्ता ग्राम नवाग्राम, पोस्ट पेडोली,ठाना-लोहागरा, जिल्हा-बरेल, विभाग खुलना, देश बांग्लादेश असे असल्याचे सांगितले.
अवैधरित्या भारतात वास्तव्य करणा-या घुसखोर नागरीकांना हृददपार करण्याकरीता विशेष शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबई यांचेशी योग्य त्या मार्फतीने पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यांना योग्य त्या पोलीस बंदोबस्तात हृदयपारीची कारवाई करण्याची तजविज ठेवण्यात आली आहे.
सदरवी उल्लेखनिय कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग परमजित सिंग दहिया, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १०, दत्ता नलावडे मा. सहा. पोलीस आयुक्त, मेघवाड़ी विभाग, संपतराव पाटील याचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक इक्बाल शिकलगार, पो. नि. गुन्हे श्रीमती वारू भारती, पोनि बतात्रेय लांडगे (काव) यांचे प्रय देखरेखीखाली दहशतवाद विरोधी पथकाने पोउनि/विजय ढवळे, पो.ह./ संजीव लांडगे यांनी केली.




































