पोलिस प्रवाह न्युज
माणगाव- दि. १३- माणगावात वनविभागाने अवैद्य खैर वाहतुकीवर कारवाई केली आहे. उपवनसंरक्षक रोहा डॉक्टर शैलेंद्रकुमार जाधव व सहा. वनसंरक्षक रोहा रोहित चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी माणगांव प्रशांत शिंदे, वनरक्षक वैशाली भोर, अनिल मोरे, किरण जाधव, पवन चौधरी यांनी दि. ११ मे रोजी दुपारी १.४५ वाजता मिळालेल्या गुप्त बातमी वरून माणगांव वनपरिक्षेत्रातील माणगांवमध्ये मन मंदिर स्वीट जवळ टाटा ट्रक क्रमांक डी एन ०९ आर ९०४७ ची तपासणी केली असता त्यामध्ये खैर सोलीव माल, घ.मी. २०.०५६ किंमत १०५३०८/- रुपये व जप्त वाहनची अंदाजे किंमत ८०००००/- रुपये विनापरवाना वाहतुक करीत असताना आढळून आला.
याबाबत भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) ब, ४२ अंतर्गत वन गुन्हा दाखल करुन वाहन व खैर सोलीव माल असा एकूण एकंदर ९०५३०८/-रुपये इतका मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. या प्रकरणी रियाज हुसेन, वय ४१ वर्ष, रा. उत्तरप्रदेश प्रदेश, रहिम फईम खान, वय २२ वर्ष, रा.उत्तर प्रदेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपवनसंरक्षक रोहा व सहा. वनसंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी माणगांव प्रशांत शिंदे, वनपाल ज्ञानदेव सुभेदार हे करीत आहे.




































