पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १५- माणगाव वाहतूक पोलीस नेहमीच आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतात. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगत अतोनात प्रयत्न करतात. माणगाव वाहतूक पोलिसांनी प्रामाणिकपणा दाखवत कौतुकास्पद कार्य केले आहे.
दि. ११ मार्च रोजी ४.५५ वाजता माणगाव शहरातील मुंबई गोवा मार्गावरील एसटी स्टँड चौकी समोर एक पडलेली बॅग मिळून आली होती. त्या बॅगमध्ये २ मोबाईल व १०००० कॅश आणि महत्वाचे कागदपत्र होते. ही बॅग हर्षदा जाधव, लोणेरे विद्यापीठ येथे टू व्हीलर गाडीवरून जॉबला जात असताना त्यांची बॅग पडली होती. मुंबई गोवा हायवे एसटी स्टँड चौकी समोर बॅग मिळून आली असता त्यांच्या मोबाईल वर कॉल आल्यानंतर स. पो. उपनिरीक्षक पाटील व वाहतूक पोलिस शिवराज बांडे, यांनी माहिती दिली की, आमच्याकडे तुमची बॅग सापडलेले आहे. त्यांना माणगाव येथे बोलावून बँग व त्यामधील वस्तू वाहतूक पोलिसांमार्फत त्यांच्याकडे स्वाधीन करण्यात आल्या. या वाहतूक पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



































