पोलीस प्रवाह न्युज
मंडणगड – दि. १७ – मंडणगड प्रतिन निसर्गरम्य वातावरणात उभ्या राहीलेल्या मिलन वृध्दाश्रमात वयोवृध्द नागरीक निराशा व एकटेपणासून दूर रहात एका वेगळ्या परिवारात रोग मुक्त दीर्घ आयुष्य जगतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दि. १५ मे रोजी मंडणगड दापोली हायवे नजीक असणाऱ्या तिडे पंचायत समिती गणातील गाव टाकेडे येथे हँबीटँट फॉर ह्युम्यानिटी फाऊंडशनचे माध्यमातून व डॉ. जलिल पारकर यांच्या संकल्पनेने साकारलेल्या मिलन वृध्दाश्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या निमीत्ताने आयोजीत स्वागत समारंभात ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, डॉ. जलील पारकर यांनी वृद्धाश्रम तयार करण्याची संकल्पना मांडली आणि स्वतः लक्ष घालून अतिशय सुंदर व राज्यात पहील्या पाच वृध्दाश्रमात सहभागी करता येईल असा वृध्दाश्रम उभा केला आहे. यावेळी याचा आनंद होत असताना बदलेल्या समाजव्यवस्थेत वृध्दांना जागा नसल्यांची खंत वाटते असेही ते म्हणाले. अलीकडच्या काळामध्ये परिवार लहान झाले त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या काही प्रमाणात कुटुंबातील परस्पर मायेचा ओलावा देखील कमी झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमांची गरज भासत आहे. भारतामध्ये कुटुंब संस्कृती इतकी चांगली होती की भारतात वृद्धाश्रमाची संकल्पना ही बराच काळ नव्हती. जेव्हा समाजात अशाप्रकारचे एखादे आव्हान उभ राहते. त्यावेळी त्या आव्हानाचा सामना करण्याकरता समाजातीलच कोणीतरी पुढे येतो आणि अशाच प्रकारे डॉ. जलील पारकर पुढे आले आणि त्यांनी ही व्यवस्था या ठिकाणी उभी केली. कोविडच्या काळामध्ये स्वतः डॉक्टर परकार हे कोविडमुळे अत्यंत टोकाचे आजारी होऊन देखील त्या काळामध्ये त्यांनी जी काही रुग्णांची सेवा केली आहे. ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे. अनेकांचा जीव त्या काळामध्ये डॉक्टरांनी वाचवीला. आताच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये पुढच्या वीस वर्षांनी आपलं सरासरी वय ८५ वर्ष होणार आहे. वयस्कर लोकांच्या समस्या त्याच्या संदर्भातल्या उपायोजनासाठी त्यांच्याकरता काय व्यवस्था केल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल असे ते म्हणाले. मिलन वृध्दाश्रमात राहणारे आपल्या परिवारापासून दूर असले तरी त्यांचा एक नवीन परिवार तयार होईल. या ठिकाणी निसर्गाचे असे सौंदर्य आहे की इथे शांतता आहे पण एकटेपण नाहीये निराशा नाही हे अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे एक प्रकारची मानसिक शांती वृध्दांना मिळेल असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास खासदार सुनील तटकरे, माहीती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार, गृहराज्य मंत्री तथा मंडणगड खेड दापोलीचे युवा कार्यसम्राट आ. ना. योगेश कदम, आमदार भाई जगताप, आमदार प्रसाद लाड, शिक्षण महर्षी पद्मश्री दादा इदाते, माजी आमदार विनय नातू, माजी आमदार सुर्यकांत दळवी, डॉ. जलिल पारकर, डॉ. आसिफ भोजानी, अँड. उल्हास नाईक, आसिफ मामला, वजाहद खान देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.




































