पोलीस प्रवाह न्युज
चिंचवड, दि. ६- श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित रसिकलाल एम धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) चिंचवड हे उत्कृष्ट शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा वारसा घेऊन २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या २५ वर्षाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी मोलाची साथ दिली आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दि. ४ ऑक्टोबर रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ७ ऑरेंज हॉस्पिटल, ब्राम्हचैतन्य हॉस्पिटल, राव डेंटल क्लिनिक, मुक्ताई हॉस्पिटल & ICU, शाईन आय क्लिनिक आणि डॉ. लाल पॅथ लॅब हे सहभागी झाले होते.

या आरोग्य शिबिरामध्ये डॉ. सुहास पाटील, डॉ. तुषार चौधरी, डॉ. श्रीकांत कासार, डॉ. श्रीकांत राव, डॉ. एस. के. टोके, डॉ. राहुल बाविस्कर, डॉ. गौरव पाटील तसेच प्रशांत घाडगे यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना आरोग्याशी संबंधीत विविध विषयांवर मार्गदर्शन करून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

या आरोग्यशिबिरामध्ये फुफुस कार्यक्षमता, रक्तदाब, दन्तचिकित्सा, नेत्र तपासणी, हाडांची खनिज घनता चाचणी, ब्लड टेस्ट तसेच इतर तपासण्या करण्यात आल्या. या आरोग्य तपासणी शिबिराचा सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घेतला. हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी तंत्रनिकेतनच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.




































