पोलीस प्रवाह न्यूज
श्रीवर्धन – ता २७ – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत शासन निर्णयन्वये शालेय परसबाग जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीची मूल्यमापन करीता रायगड जिल्हा परिषद शाळा रानवली शाळेला भेट देण्यात आली.यावेळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धे करिता रायगड जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून एक शाळा निवड करण्यात आली.जिल्हा मूल्यमापन समितीने रायगड जिल्हा परिषद शाळा रानवली मराठी या शाळेला मूल्यमापनासाठी भेट दिली.शालेय परसबाग निरीक्षण समितीने केले.शालेय परसबागेत मुळा, माठ, पालक, बीट, गाजर, मेथी, कोथिंबीर, वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, तूर, मटकी, पावटा इ. भाजीपाला लागवड करण्यात आली असून जांब, पेरु, चिकू, अननस, नारळ, सीताफळ, लिंब, आवळा, शेवगा, पपई व स्ट्रॉबेरी इ. फळझाडांची लागवड शालेय परिसरात केली आहे.
मूल्यमापन समितीच्या भेटीच्या वेळी सरपंच रानवली सुरेश मांडवकर, समाजसेवक राजू जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कृणाली अडखळे, मुख्याध्यापक भिकू पांगारकर, सहशिक्षक नीलेश श्रीवर्धनकर व सहशिक्षिका मानसी माळवदे उपस्थित होते.लेखाधिकारी जिल्हा पोषण आहार श्रीकांत मोरे हे मूल्यमापन समितीचे प्रमुख म्हणून उपस्थित होते. शाळेने राबविलेले उपक्रमाची त्यांनी स्तुती केली.
संपूर्ण बागेला ठिबक सिंचनाने पाणीपुरवठा केला जातो. शालेय परसबाग निगा राखण्यासाठी सहा इको क्लब तयार केले आहे. संपूर्ण परसबागेतील तयार होणारा भाजीपाला मध्यान्ह पोषण आहार योजनेत वापरला जातो उर्वरित भाजीपाला दर शनिवारी विक्री केला जातो. शालेय परसबाग निर्मितीमध्ये रानवली मराठी शाळा सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक संपादन करीत आहेत.




































