पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २६ – लोणेरे येथे ओमकार रेसिडेन्सी येथे झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपी अनिस मोहम्मद खान मालदारला अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. दि. २६ एप्रिलच्या मध्यरात्री ठाणे मुंबई येथूनअटक करण्यात आली आहे. आरोपीला अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने दि. ३० एप्रिल पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये घडलेल्या २२ वर्षीय तरुणी वरील अत्याचार व निर्घृण हत्येप्रकरणी संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली होती. या घटनेच्या सहा दिवसानंतर आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार याला पोलिसांनी अथक परिश्रम करून अटक केली आहे. आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार याने तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला करून घटनास्थळावरून पलायन केले होते.
लोणेरे येथील मुंबई गोवा महामार्गालगत आलेल्या ओमकार रेसिडेन्सी येथे दि. २० एप्रिल रोजी रुम नंबर १०१ मध्ये हॉटेल सफाई कामगार गेला असता दरवाजा ठोकावल्यानंतर आतून कोणताही प्रतिसाद असल्याने लॉजिंग चालकाला संशय आल्याने त्यांनी तातडीने गोरेगाव पोलीस ठाणे येथे संपर्क केला होता. गोरेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर तरुणी बेडवर ब्लँकेट अंगावर असलेल्या अवस्थेत दिसून आली होती. पोलिसांनी ब्लँकेट हटविले असता रक्तबंबाळ अवस्थेत धारदार शस्त्राने तरुणीवर वार केल्याचे निदर्शनास आले. तातडीने फॉरेस्निक टीम, डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल होते. या मृत तरुणीचे नाव पल्लवी मोरे, वय २२ वर्षे, रा. वडगाव बौध्दवाडी, ता. माणगाव असे होते.
गोरेगाव पोलिस ठाणे येथे आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार, वय ३८ वर्ष विरोधात हत्या, लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मौजे तळवली येथील रहिवाशी आहे. काही वर्षांपूर्वी आरोपी गाव सोडून मुंब्रा येथे राहायला गेला होता. स्वतःच्या मुलीच्या हत्या प्रकरणी काही काळ कारागृहात देखील होता. रायगड पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते. आरोपीचं नाव आणि ओळख पटल्या नंतर त्याला शोधण्यासाठी पोलीस टीम रवाना करण्या आल्या होत्या. त्या लॉजचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, पण आजूबाजूचे काही सीसीटीव्ही फुटेज मिळू पोलिसांनी मिळविले होते. त्याव्यतिरिक्त रूममध्ये जे जेवणाचे पार्सल पडलेले होते, ते आजूबाजूच्या हॉटेलवरून आणलेले असावे, त्या संदर्भानेही शोध घेतला होता. अखेर पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







































