पोलीस प्रवाह न्यूज
पिंपरी-चिंचवड : दि .२३ – मावळचे महासंसदरत्न खासदार व शिवसेना उपनेते मा. श्रीरंग अप्पा बारणे तसेच युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव मा. विश्वजीत दादा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत आगामी ३० ऑगस्ट रोजी आयोजित भव्य रोजगार मेळाव्याचे नियोजन तसेच पुढील सहा महिन्यांतील युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत “युवासेना आपल्या दारी” ही महत्त्वाकांक्षी संकल्पना युवासेना महानगरप्रमुख संतोष म्हात्रे यांनी मांडली. या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभाग, महाविद्यालय आणि युवकांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार करण्यात आला आहे. रोजगार, क्रीडा, सेल्फ डिफेन्स, व्यसनमुक्ती, आरोग्य आणि कौशल्य विकासासंदर्भातील विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
विद्यार्थी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पिंपरी विधानसभा प्रमुख अनिश काळभोर यांच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांमध्ये युवासेना शाखांच्या बोर्डांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच युवतीसेना जिल्हाध्यक्ष सायली साळवे यांच्या नेतृत्वाखाली युवतींसाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. स्थानिक व जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी शहरप्रमुख चेतन बेंद्रे हे संबंधित आयुक्त व प्रशासनाची भेट घेणार आहेत. चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा क्षेत्रात युवासेनेची वज्रमूठ अधिक मजबूत करून मोठ्या संख्येने युवक-युवतींना संघटनेशी जोडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. ही बैठक कार्यकारिणी सदस्य रुपेशजी कदम तसेच युवासेना जिल्हाध्यक्ष सागरजी पाचर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मंगेशजी नढे, युवती उपजिल्हाप्रमुख अश्विनी जाधव, कॉलेज कक्ष उपाध्यक्ष ऋषिकेश जोशी, युवती शहर प्रमुख श्वेता कापसे, उपशहरप्रमुख सुजित कांबळे व कुणाल जगनाडे, भोसरी विधानसभाप्रमुख अनिकेत बाबर, तसेच राजीव मेनन, चांद पटेल, ओंकार भागवत, सागर शिंदे आणि इतर पदाधिकारी व खंदे युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“युवासेना आपल्या दारी” या मोहिमेत शहरातील सर्व तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन संघटनात्मक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन युवासेना महानगरप्रमुख संतोष देवीदास म्हात्रे यांनी केले आहे.










































