पोलीस प्रवाह न्यूज
पिंपरी-चिंचवड : दि ५ – संत तुकाराम नगर येथील सामाजिक कार्यकर्ते राजू भाऊ आवळे, सुखवानी कॅम्पस येथील सागर चव्हाण तसेच वैशाली नगर–नानेकर चाळ येथील सामाजिक कार्यकर्ते सागर कापसे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील शिवसेनेच्या संघटनात्मक कार्याला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
युवा सेना महानगर प्रमुख संतोष म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश झाला. परिसरातील युवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या प्रवेशामुळे चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी महानगर प्रमुख राजेश फाळके आणि युवा भोसरी विधानसभा प्रमुख गणेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.










































