पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २९ – संपूर्ण राज्यात १२ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. परंतु, ते आता दोन दिवस पुढे गेले असून ७ फेब्रुवारी रोजी मतदाराची नवीन तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.
करण्यासाठी दि.३१/०१/२०२६ च्या पुढे २ आठवड्यांची मुदत दिलेली आहे. मात्र, दि.२८/०१/२०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री श्री. अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्य शासनाने संदर्भाधीन अ.क्र.३ समोरील दि.२८/०१/२०२६ रोजीच्या बिनतारी संदेशान्वये राज्यात दि.२८/०१/२०२६ ते दि.३०/०१/२०२६ पर्यंत राज्य स्तरावरील दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पत्रक काढत नव्याने मतदान कार्यक्रम जाहीर केला आहे.
जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमाची सुचना प्रसिध्द करण्याची तारीख दि. ३१/०१/२०२६ (शनिवार)
मतदानाची तारीख दि.०७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) (सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत)
मतमोजणी तारीख दि.०९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) (सकाळी १०.०० पासून)
निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिध्द करणे दि.११ फेब्रुवारी २०२६ (बुधवार) पर्यंत


































