पोलीस प्रवाह न्युज
महाड, दि. ३०- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका चालूच असून दि. ३० मे रोजी पोलादपूर तालुक्यातील लोहार माळ येथे कोकण कृषी विद्यापीठात कार्यरत असलेले अनिल मार्कड हे कर्मचारी आपल्या कुटुंबासह नगर येथून दापोलीला जात असताना रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या उभ्या असलेल्या कंटेनरला धडकून हा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात सद्यस्थितीत दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी असल्याचे माहिती अद्याप प्राप्त झाली आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील लोहार माळ येथे दुपारच्या सुमारास नगर जिल्ह्यातून रत्नागिरी येथील दापोली कृषी विद्यापीठातील कार्यरत असलेले अनिल मार्कड हे आपल्या कुटुंबासह एम एच ०८ ए एन २४३९ या हुंडाई कंपनीच्या क्रेटा गाडीने प्रवास करीत होते. त्याच दरम्यान लोहार माळ येथे उभ्या असलेल्या कंटेनरला त्यांची गाडी जाऊन धडकली. धडक एवढी गंभीर होती की या गाडीतून प्रवास करणारे त्यांच्या कुटुंबांमधील दोन जण जागीच ठार झाले तर अन्य दोन जण गंभीर जखमी आहेत.











































