पोलीस प्रवाह न्युज
जीवनाच्या वहीत काही पाने कोरीच राहिली
काही स्वप्नांची फुले उमलण्याआधीच कोमेजली…
काही शब्द ओठांवर येऊनही थांबले
काही भाव मनाच्या कप्प्यातच विरून गेले….
काही माणसं मनाच्या पानावर उतरली
काही नाती काळाच्या ओघात
वाहून गेली….
काही क्षणांना पुन्हा जगावंसं वाटलं
काही आठवणींना अलगद मनात कोरलं….
काही इच्छा परिस्थितीने हिरावून नेल्या
काही अपेक्षा नियतीने अपुऱ्याच ठेवल्या…
कधी मनापासून आनंदाने पानं रंगवली
कधी अश्रूंनी घात करत अक्षरं पुसली…
या सर्वात स्वतःसाठी जगायचं राहून गेलं
मग दुसऱ्यांसाठीच आयुष्य वाहून घेतलं….
तरीही त्या कोऱ्या पानांची खंत नाही
कारण उद्याची स्वप्नं अजून संपलेली नाही…
नव्या आशेची लेखणी हाती घ्यायची आहे
मनातल्या इच्छांना वसू पुन्हा वाट देवू पाहे…
जीवनाच्या वहीत काही पाने कोरीच राहू देत
पण उरलेल्या पानांवर आनंदाचे शब्द फुलू येऊदे…
जीवनाचे वर्तुळ गोल चक्र जसे
मनातील विचार पूर्णत्वाकडे नेईल तसे…
जीवनाची वही जगातून जाईपर्यंत लिहायची
उरली पाने कोरी तरी स्वप्नातून पूर्ण करायची….
वाटते जीवन तेवढे सोपे नसते बरं
सुख, दुःख, आनंद, यातच रमायचे खरं…
वसुधा वैभव नाईक, पुणे ✒️
मो. नं. 9823582116












































