पोलीस प्रवाह न्युज
मुंबई, दि. २१-मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सुदर्शन चव्हाण यांची कन्या श्रेष्ठा चव्हाण हिने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे चव्हाण कुटुंबासह मुंबई पोलीस दलातूनही तिचे कौतुक होत आहे.
माझगाव येथील सेंट पीटर शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या श्रेष्ठाने १४ नोव्हेंबर २०२६ रोजी ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने एसएनडीटी महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला होता. ‘ऊर्जेची बचत’ या विषयावर तिने साकारलेल्या चित्राला महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळाला. याबद्दल तिला ३० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देवल यांच्या उपस्थितीत श्रेष्ठाचा सत्कार करण्यात आला. या यशाच्या जोरावर आता ११ डिसेंबर २०२६ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली आहे.
लहान वयातच कलाक्षेत्रात राज्यस्तरावर यश मिळवणाऱ्या श्रेष्ठा चव्हाण हिचे सर्वत्र अभिनंदन होत असून, राष्ट्रीय स्पर्धेतील तिच्या कामगिरीकडे आतालक्ष लागले आहे.
लक्ष लागले आहे











































