पोलीस प्रवाह न्यूज
पुणे : दि. १७ – प्राधिकरणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयहिंद मित्र मंडळाच्या माध्यमातून यंदा गणेशोत्सवानिमित्त ‘अहिरावणाचा वध’ हा आकर्षक हलता देखावा सादर करण्यात आला आहे. तसेच हरित सेतू प्रकल्पाविरोधात जनजागृती करण्यात येत आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक प्रबोधन, जनजागृती आणि समाजहिताचा संदेश देण्याचे प्रभावी माध्यम आहे, ही भूमिका जपत मंडळाने यंदाचा गणेशोत्सव साजरा केला आहे.













































