पोलीस प्रवाह न्युज
माणगाव – दि. २४- तालुक्यातील मांगवली गावचे सुपुत्र तथा बामणोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश काळुराम पवार व हातकेली गावचे सुपुत्र हिरु गणपत शिर्के
यांना आविष्कार फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय ” महाराष्ट्र रत्न गौरव” पुरस्कार २०२५ ने रविवार दि. १८ मे रोजी कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या नात कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित व बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य प्रबंधक, डूमुनी मुर्म यांच्या हस्ते व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ पत्रकार संजय पवार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे न्यूरोसर्जन व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.संतोष प्रभू, विशेष निमंत्रित सदस्या मागासवर्गीय आयोग भारत सरकार सुरेखा लांबतुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले.

उपसरपंच मंगेश पवार व हिरू शिर्के यांना उपरोक्त संस्थेकडून ” महाराष्ट्र रत्न गौरव” पुरस्कार २०२५ ने सन्मानीत करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून फाउंडेशनचे कोकण विभागीय अध्यक्ष संदीप नागे, अँड.पुंडलिक मालोरे,रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे व जिल्हा संघटक भालचंद्र खाडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
आविष्कार फाऊंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात गेली १९ वर्षे कार्यरत आहे. या फाऊंडेशनतर्फे समाजात वेगवेळ्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जिल्हा व राज्य स्तरावर पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येतो. यावर्षी फाऊंडेशनतर्फे पन्हाळगड, जि.कोल्हापूर याठिकाणी भव्य दिव्य अशा कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात उपसरपंच मंगेश पवार व हिरू शिर्के यांचा सामाजिक, राजकीय व कृषी क्षेत्रातील कामगिरी व समाजाप्रती काम करण्याची त्यांची असणारी आवड विचारात घेऊन त्यांचा संस्थेतर्फे राज्यस्तरीय ” महाराष्ट्र रत्न गौरव” पुरस्कार २०२५ ने सन्मान करण्यात आला. राज्य पुरस्कार निवड समिती सदस्य माधुरी सावंत, फाउंडेशनचे कोकण विभागीय अध्यक्ष संदीप नागे, अँड.पुंडलिक मालोरे आदी मान्यवरांसह राज्यभरातून पुरस्कारती व नागरिक बंधू – भगिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




































