पोलीस प्रवाह न्युज
गुजरात, दि. १२ – गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे .अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात २४२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान दाटीवाटीच्या रहिवासी भागात कोसळलं. गुजरातहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया (AI 171) हे विमान अहमदाबादच्या सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाहून टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात क्रॅश झाले. तब्बल ७०० फुटांवरून हे विमान कोसळलं आहे . घटनास्थळी प्रचंड आग व धुराचे काळे लोट दिसत आहेत. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद विमानतळ बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे
गुरुवार दि. १२ जून रोजी दुपारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं (AI171) हे प्रवासी विमान टेकऑफनंतर अवघ्या काही सेकंदांत भीषण अपघातग्रस्त झालं. लंडनकडे जाणाऱ्या या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. विमान टेकऑफ झाल्यानंतर काही वेळातच जमिनीवर कोसळले. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली होते.
कॅप्टन सुमित सभरवाल हे एलटीसीचे ८२०० तासांचा अनुभव असलेले विमानचालक आहेत. सह-वैमानिकाला ११००० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. कॅप्टन सुमित सभरवाल यांनी शेवटच्या क्षणापर्यंत विमानावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. पण विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले. अपघातस्थळावरून प्रचंड काळा धूर येत असल्याचे दिसून आले.



































