पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. ७- हिवरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब सखाराम पवार यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विजय चतुर्भुज इरकर यांची निवड करण्यात आली. सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेत पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
सदस्य म्हणून अर्चना गोरख पवार, गणेश इवरे, सपना लांडगे, प्रकाश लांडगे, शीतल राजेंद्र इरकर, शबाना साजिद मुलाणी, हनुमंत सुरवसे, राहुल पवार, भारती मेरगळ, नाना वारे, आमीन सय्यद यांची निवड करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.











































