पोलीस प्रवाह न्युज
करमाळा- दि. २३- तालुक्यातील मांगी गावचे सुपुत्र गायक पत्रकार प्रवीण कुमार अवचर यांचा दि. २२ मे रोजी अतिशय आदर्श पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी प्रथम करमाळा नगरीचे आराध्य दैवत माता कमला भवानीच्या मंदिरात दर्शन घेऊन मंदिरासाठी देणगी दिली व त्यानंतर करमाळा येथील बुद्ध विहारामध्ये धम्मदान केले.
वास्तविक पाहता हल्लीच्या काळात वाढदिवस म्हणजे फॅशन झालेली आहे .सध्या नवीन पिढी कढुन वाढदिवस साजरा करत असताना दारू पार्टी केक कटिंग ईतर गोष्टींवर अमाप खर्च केला जातो. वाढदिवस हा नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंद उत्सव असतो तो नक्कीच थाटामाटात साजरा करावा परंतु ते करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचाही प्रयत्न करावा. आज ज्याप्रमाणे प्रवीण अवचर यांनी हा आदर्श वाढदिवस साजरा केला. नक्कीच नवीन पिढीला आदर्श घालून देण्याचे काम यांनी केलेले आहे. प्रवीण अवचर यांच्या स्तुत्य उपक्रमाच राजकीय, शैक्षणिक सामाजिक, वैद्यकीय, कृषी कलाक्षेत्रातील मित्र परिवारासह मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे.




































