पोलीस प्रवाह न्यूज
पुणे पिंपरी : दि. १३ – महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मातोश्री चषक राज्यस्तरीय थाई किक बॉक्सिंग स्पर्धा मोठ्या दिमाखात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातून ३२० खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

सांघिक विजेतेपद आर्यन्स मार्शल आर्ट्स, संत तुकाराम नगर, पिंपरी-चिंचवड यांनी पटकावले. अहिल्यानगर संघाने द्वितीय, तर पुणे जिल्हा संघाने तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेचे उद्घाटन आमदार अमितजी गोरखे, महापौर रवीभाऊ लांडगे तसेच संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आव्हाड साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू आप्पा कदम, लहुजी सेनेचे राजा भाऊ आवळे, सामाजिक कार्यकर्ते युवराज लांडे, देवदत्त लांडे, राजेश बैकर आणि सुभाष कोळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना बक्षिसांचे वितरण सामाजिक कार्यकर्ते डॉ. संदीप बागडे, पांढरकर सर, शिक्षक संतोष नेटके, अभिषेक शो, मोहिन बागवान, प्रतीक धायगुडे, कृष्णा नायर आणि जुई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून आदित्य अडागळे, आदित्य शिरसाठ, स्नेहल लहाने, आरती गुप्ता, ओम पांढरकर, समीर लोहार, भक्ती टेमरे, शरयू म्हात्रे, ओम देशमुख आणि युशा खातीब यांनी उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली.
या राज्यस्तरीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र थाई किक बॉक्सिंगचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध, दर्जेदार आणि यशस्वीरीत्या पार पडली. उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक, पालक आणि खेळाडूंनी आयोजनाचे विशेष कौतुक केले. यावेळी संतोष म्हात्रे यांनी सांगितले की, “राज्यातील गुणवंत खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि थाई किक बॉक्सिंगचा प्रसार करणे हेच आमचे ध्येय आहे. भविष्यातही अशाच दर्जेदार स्पर्धांचे आयोजन करून महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”











































