पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ३- तालुक्यातील कुंभे काळ जलविद्युत प्रकल्पाचे काम गेल्या २० वर्षापासून बंद होते. महायुतीच्या सरकारमध्ये या कामासाठी १६६६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या कामाला जोरदार सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमदार व महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व खार भूमी विकास मंत्री ना .भरत गोगावले यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. या प्रकल्पामुळे आता माणगाव तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याचे बोलले जात असून आजूबाजूची हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येत असल्याने या ठिकाणी हरित क्रांतीला देखील चालना मिळणार आहे. एकीकडे पर्यटकांचा पावसाळ्यात मोठी रीघ कुंभे धबधबा पाहण्यासाठी होत असते त्याच्यातच आता या प्रकल्पाला महायुतीच्या माध्यमातून मिळालेली गती ही या परिसरातील अर्थकारणाला मजबुती देणारे असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाचे काम पावसाळया नंतर चालू होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.





































