पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ९- मागील ३ दिवसांपूर्वी माणगाव मध्ये आयकर विभागाची एका टॅक्स कन्सल्टंट च्या कार्यालयावर धाड पडल्याची माहिती खाजगी सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या टॅक्स कन्सल्टंट कडे पडलेल्या धाडीनंतर माणगाव आणि सोबतच्या तालुक्यातील सुमारे ५०० शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या आय टी फाईल रिवाइज करण्याचे आयकर विभागाने निर्देश दिले असल्याची देखील माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे.? मात्र माणगाव मध्ये आयकर विभागाची धाड अशी चर्चा नाक्या – नाक्यावर दबक्या आवाजात सुरू असलेली दिसून येत आहे.
मात्र आयकर विभागाने एका टॅक्स कन्सल्टंट वर पडलेली धाड आणि त्यानंतर सुमारे ५०० अधिकारी आणि कर्मचारी यांना आय टी फाईल रिवाइज करण्याचे जर खरोखरच आदेश मिळाले असतील तर ह्या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल आहे?. अशी चर्चा देखील माणगाव तालुक्यातील सुजाण नागरिकांकडून ऐकावयास मिळत आहे. मात्र हे प्रकरण खरे असल्यास माणगाव तालुक्यातील लपून बसलेले टॅक्स बुडवे यांच्यावर देखील आयकर विभागाची करडी नजर असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आली रे आली …आता तुझी बारी आली… अशी सिंघम फिल्म स्टाईल चर्चा देखील माणगाव तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे.
































