पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १२- जनतेच्या समस्या, तक्रारी आणि विकासाच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने माणगावमध्ये काँग्रेस पक्षाचे नूतन कार्यालय सज्ज झाले आहे. रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या प्रेरणेतून तसेच माणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र सिंह यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या कार्यालयाचे उद्घाटन सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मधुकर ठाकूर (राजाभाऊ ठाकूर) यांच्या शुभहस्ते होणार आहे.
माणगाव-निजामपूर मार्गावर ‘शिव शंभू’ निवास, जिओ मोबाईल कार्यालयाशेजारी हे कार्यालय उभारण्यात आले असून, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका, नियोजन आणि नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील भूमिकेचा भाग असलेल्या ‘व्होट चोरी, मत वाचवा’ या अभियानालाही या कार्यालयाच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाणार आहे. मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांच्या जतनाबाबत जनजागृती करण्यावर काँग्रेस पक्षाचा भर राहणार आहे.
याबाबत डॉ. नरेंद्र सिंग यांनी सांगितले की, उद्घाटन सोहळ्यास तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे. तसेच नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी व तक्रारी पक्षाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पक्षपातळीवर सर्वतोपरी प्रयत्न या कार्यालयामार्फत केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकंदरीत, माणगावमधील हे नूतन कार्यालय केवळ पक्षाचे संघटनात्मक केंद्र न राहता जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे आणि ‘व्होट चोरी, सेव्ह युवर व्होट’ अभियानाद्वारे लोकशाही हक्कांविषयी जनजागृती करणारे ‘जनसेवा दरबार’ ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












































