पोलीस प्रवाह न्युज
पिंपरी, दि. ११- इंडिया थाई किकबॉक्सिंग फेडरेशनच्या वतीने गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय थाई किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप व टायटल बेल्ट स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या यशस्वी खेळाडूंचा सत्कार मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा संसदरत्न श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (११ ऑक्टोबर) थेरगाव येथील त्यांच्या कार्यालयात करण्यात आला.
या स्पर्धेत शरयू म्हात्रे, सायली घोडके, प्रतीक लांबाते आणि कुणाल जोगदंड यांनी टायटल बेल्ट पटकावला. तसेच आदित्य आडागळे, संजीवनी पाटाईत, आराध्या करपे, अयांश इटकर, श्लोक अभंग, रुद्वेद अभंग, श्रुतीका मोरे आणि धनश्री शिंपले यांनी सुवर्णपदके मिळवली. अयांश इटकर याने तीन सुवर्णपदकांची कामगिरी केली.
समीर लोहार, दिवित शहा, आदित्य पवार, साईराज कांबळे, प्रतीक मुंडे, श्रेया कदम, हर्षवर्धन कदम आणि आदिती तांबे यांनी रौप्यपदके, तर आमिर लोहार, अश्मित तूपदार आणि स्वरांश भदाणे यांनी कांस्यपदके मिळवली.

या सर्व खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी इंडिया थाई किकबॉक्सिंग फेडरेशनचे चेअरमन संतोष दादा बारणे, नगरसेवक व पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे सचिव विश्वजित दादा बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
इंडिया थाई किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे, सीनियर प्रशिक्षक अविनाश पवार, प्रसाद अभिषेक श्वा आणि तेजल पवार उपस्थित होते. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून पिंपरी-चिंचवडचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचे यावेळी मान्यवरांनी अभिनंदन केले.













































