पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २५- तालुक्यातील ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळाडूंमध्ये संधी मिळावी. माणगाव तालुक्यात आणि ग्रामीण भागातून उत्कृष्ठ कामगिरी करणारा क्रिकेट खेळाडू तयार व्हावा, या मानसिकतेने प्रेरित झालेल्या अनेक क्रिकेट संघटना माणगाव तालुक्यात कार्यरत आहेत. त्यांची कामगिरी देखील तेवढ्याच जोमाने सुरू आहे. यामध्ये कळमजे गावचे सुपुत्र मुकुंद वाढवळ आणि नंदुराज वाढवळ हे देखिल कुठेही कमी राहिले नाहीत. यांच्या माध्यमातून दि. २४ व २५ जानेवारी रोजी भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन लहाने सुरव मैदान येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेची पारितोषिके अनुक्रमे प्रथम क्रमांक रोख रक्कम ७० हजार व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम ३५ हजार व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक रोख रक्कम १५ हजार व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक रोख रक्कम १५ हजार व आकर्षक चषक अशी असणार आहेत. यामध्ये पाहिल्या दिवशी १६ संघ गाव टू गाव खेळवले जातील. व दुसऱ्या दिवशी असोसिएशन पॅकर ८ संघ, ओपन ८ संघ खेळवले जातील असा कमिटी निर्णय देखील घोषित करण्यात आला आहे.
या स्पर्धेची प्रवेश फी ८५०० रुपये असणार आहे.आणि या स्पर्धा डे नाईट आहेत.व यांचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे.या स्पर्धेत लकी ड्रॉ कूपन असून यामध्ये बक्षिसे इस्त्री आणि कूलर ठेवण्यात आलेली आहेत.या भव्य क्रिकेट संग्रामात संघानी सहभागी होण्यासाठी निलेश उभारे, तुषार वाढवळ, राहुल बक्कम, अनिल राऊत, अंकित वाढवळ, सुरज वाढवळ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन समाजसेवक मुकुंद वाढवळ व नंदुराज वाढवळ यांच्याकडून तसेच आयोजक कमिटी कडून करण्यात आले आहे.




































