पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २- मुळगाव केळगण येथील सर्व ग्रामस्थांनी एक विचाराशी एकरूप होऊन संपूर्ण गाव गावातील ग्रामस्थ यांनी दि. २ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. विकासकामांची गती आणि दिलेला शब्द पाळण्याची ताकद पाहता आदरणीय खासदार सुनील तटकरे हेच करू शकतात त्यामूळे विकासात्मक कामावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस महाड पोलादपूर विधानसभा क्षेत्र मा. अध्यक्ष चंद्रशेखर (बाबूशेठ) खानविलकर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच निजामपूर विभागीय अध्यक्ष तुकाराम सुतार व युवक राष्ट्रवादी अध्यक्ष शैलेश खांडसकर, केळगण मुंबई अध्यक्ष सुनीलजी तेलंगे , निजामपूर विभाग सचिव किरण पागार, युवा नेते शिवाजी घाग व कार्यकर्ते यांचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची मेहनत लक्षात घेता निजामपूर विभागात राष्ट्रवादी पक्ष पुन्हा जोर धरू लागला आहे. या पक्ष प्रवेशात मूळ गाव केळगण मधील महादेव कडू, सुदाम कडू, मारुती पवार, बळीराम साळवी, गणेश मोरे, भाऊ पार्ट, जयराम कडू, वसंत मोरे, हरिश्चंद साळवी आदी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशावेळी जेष्ठ नेते बाळाराम कडू, गुणाजी भोसले, सुधाकर साबळे,जनार्दन शिळीमकर,वामन मोरे, भरत मोरे,मनोज साळवी, सुबोध कडू, शिवराम पवार, मनोज कडू, महेंद्र साळवी व बहुसंख्य मूळगाव केळगण ग्रामस्थ उपस्थित होते.




































