पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १५- कोकणचे भाग्यविधाते, रायगड रत्नागिरीचे विकासपुरुष केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय समिती चेअरमन खा. सुनिल तटकरे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त रोहा येथे युवकाना प्रेरणादायी अशी “खासदार श्री”शरीरसौष्ठव स्पर्धा रोहा येथे भाटे सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कोलाड(आंबेवाडी)येथील नवयुवक मनिष राम भालेकर हा ८ व्या क्रमाकांत आला आहे. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातून एकूण सुमारे ४० स्पर्धक सहभागी झाले होते.
अथक परिश्रम आणि स्वतःचे कंपनीतील काम सांभाळून शरीराला व्यायामाची नेहमी सवय असावी अशा उद्देशाने प्रेरीत होऊन मनीष भालेकर यांनी काम सांभाळत शरीरसौष्ठवाकडे लक्ष केंद्रित केले. त्याला हे यश प्राप्त झाले असल्याचे त्यांना सांगीतले आहे. याबाबत मनिष भालेकर यांचे रोहा तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार तसेच माणगाव तालुका पत्रकार सेवा संघाचे सर्व पदाधिकारी व सल्लागार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
































