१५ लाखांच्या कामाला सुरुवात; जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे यांच्या हस्ते सोहळा संपन्न.
पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २८-निजामपूर मोहल्ला येथील कब्रस्तानाच्या संरक्षक भिंतीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे यांच्या हस्ते पार पडला. अंदाजित १५ लाख रुपये किमतीच्या या कामामुळे कब्रस्तानाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
रायगडचे पालकमंत्री ना. भरतशेठ गोगावले, युवासेना कोअर कमिटी महाराष्ट्र राज्य सचिव व रायगड जिल्हा परिषद सदस्य विकासशेठ गोगावले तसेच निजामपूर पंचायत समिती गटाचे जिल्हा परिषद सदस्य व युवासेना उपजिल्हा प्रमुख अविनाश नलावडे यांच्या प्रयत्नाने या कामाला मंजुरी मिळाली आहे.
निजामपूर मोहल्ला कब्रस्तानाच्या संरक्षक भिंतीचे काम मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे. या कामामुळे कब्रस्तानाच्या संरक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला पंचायत समिती सदस्य अक्षय जाधव, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर पवार, गणेश पवार, प्रसाद (बंड्याशेठ) गुरव, माजी सरपंच राजाराम रणपिसे, पंढरी उतेकर, युवासेना माणगाव तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उतेकर, बाळाराम दबडे, निजामपूर येथील दोन्ही मोहल्ल्यांचे अध्यक्ष (सदर) तसेच मोहल्ल्यातील नागरिक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर आणि नागरिकांच्या सहभागात भूमिपूजन सोहळा पार पडला. निजामपूर मोहल्ल्यातील कब्रस्तानाच्या संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात होण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.












































