खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी नासिर यांची घेतली भेट
पोलीस प्रवाह न्युज
खडकी, दि. ३०- संत तुकाराम नगर परिसरातील कचऱ्याच्या गंभीर प्रश्नावर त्यांच्यासोबत जवळपास दीड तास सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जागेवर कचरा टाकण्यासंदर्भात महानगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये पूर्वी झालेल्या चर्चेची पार्श्वभूमी, जबाबदाऱ्या तसेच सध्याची परिस्थिती याबाबत सविस्तर माहिती मिळाली.
सध्या दोन्ही विभागांच्या भूमिकेमध्ये काहीसा समन्वयाचा अभाव असल्यामुळे कचरा जागेवर शिल्लक आहे. मात्र हा वाद कोणाचा कचरा आहे यावर न राहता, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा कचरा लवकरात लवकर उचलला जाणे महत्त्वाचे आहे.
N. M. Nasir साहेबांनी या विषयावर सविस्तर माहिती दिली आणि सकारात्मक चर्चा केली. त्याबद्दल त्यांचे आभार.
यापुढे महानगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्यात समन्वय साधून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न आहे… त्यामुळे तोडगा निघेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील!
संतोष देविदास म्हात्रे
महानगर प्रमुख – युवा सेना
पिंपरी-चिंचवड शहर












































