पोलीस प्रवाह न्युज
माणगाव- दि. १६- तालुक्यातील मौजे ढालघर येथील ग्रामदेवता स्वयंभू श्री सोमजाई मातेच्या नूतन मंदिराचा जीर्णोद्धार कलशारोहण व सभामंडप उद्घाटन सोहळा दि. १८ मे रोजी ज्ञानभास्कर श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांच्या दिव्य सानिध्यात व महिला व बाल विकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
दि. १७ मे रोजी दुपारी ३ वा. नूतन कलशाची सवाद्य १०८ कुंभकलशासह सुवासिनी सहित ग्राम प्रदक्षिणा व मिरवणूक, संध्याकाळी ७ ते ८.३० महाप्रसाद, ८.३० ते १० वा. जय भवानी महिला मंडळ वाशी रोहा यांचे नृत्य, १० ते १२ शिवशंभो प्रसादिक भजन मंडळ ढालघर यांचा कार्यक्रम तसेच १८ मे रोजी सकाळी ६.३० वा. ध्वजारोहण ग्रामदेवता मान पान विडे, सकाळी ७ वा. पूजा विधान प्रारंभ, सकाळी ९ ग्रामदेवता श्री सोमजाई मातेवर ५२ पात्री आभिषेक, सकाळी १०.३० ते ११.३० वा. होम हवन, सकाळी ११.३० वा. कलशारोहण आणि सभामंडपाचे उद्घाटन, दुपारी १२ वा. पूर्णाहुती, आशीर्वचन, महामंगल आरती,
दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ६ वा. शिवपाठ, सायं. ७ ते ९ महाप्रसाद, रात्री ९ वा. भजन, रात्रौ १० वा. महिलांचा जागर आणि दि. १९ मे रोजी पहाटे ४ ते ६ वा. श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन, ६ ते ९ चंडीयाग प्रारंभ, ९ वा आरती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, ग्राम पंचायत लोणशी सरपंच सिद्धेश पालकर, उपसरपंच मच्छिंद्र म्हस्के, सदस्य शांताराम ढमाले, श्रावणी तेटगुरे, सदस्य व ढालघर ग्रामस्थांनी केले आहे.




































