पोलीस प्रवाह न्युज
धाराशिव, दि. २- महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल (SRPF) तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रमोद तानाजी वाघमारे हे गेली १४ वर्षांपासून पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत हजारो पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच SRPF जवानांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून दिला असून, त्यांच्या कार्याचे महाराष्ट्र पोलीस दलातून कौतुक होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
आगामी पोलीस भरती तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्र पोलीसांचे महत्त्वाचे मुद्दे मांडून ते कशाप्रकारे सोडविले जातील, यावर चर्चा करण्यासाठी प्रमोद वाघमारे यांचा संपूर्ण विदर्भ दौरा आयोजित करण्यात आला आहे.
या दौऱ्यात यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, अकोला, अमरावती, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांची नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.











































