पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १७ – तालुक्यातील नावाजलेल्या जिल्हा परिषदेच्या रेपोली उच्च प्राथमिक शाळेमध्ये १६ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षीही शाळेत पहिल्यांदाच इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या लहान मुलांसाठी एक भव्य स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेत पहिल्यांदाच इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत लेझीमच्या तालावर मिरवणूकीने नवागत विद्यार्थ्याना शाळेत आणण्यात आले. गुलाब फुले आणि ओवाळणी करून त्यांचे आपलेपणाने स्वागत करण्यात आले.
पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या मुलांसाठी मनोहारी असे ‘पहिले पाऊल’ हे उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमात कागदावर पाऊलांचे ठसे घेण्याची अनोखी प्रथा ठेवण्यात आली. जी या मुलांसाठी नव्या शैक्षणिक वाटचालीची नांदी ठरली. शाळेच्या पहिल्याच दिवशीच मुलांना पाठ्यपुस्तके, गणवेश यांचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यंदापासून इयत्ता पहिली पासूनच CBSC पॅटर्न अंमलात आणण्यात येणार असल्याने व शाळेची वाढती प्रगती यामुळे पालकांमध्ये उत्साहाचे वातावरणात होते. ज्यामुळे शिक्षणाच्या दर्जात अधिक वाढ होणार आहे. यामुळेच शाळेच्या मुलांना आणि पालकांना आनंदित होण्याचे कारण आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी IDBI बँकेचे मॅनेजर सचिन कुमार उपस्थित होते. झेड. पी. च्या शाळेत एवढं छान शिक्षण मिळत आहे याचे समाधान व्यक्त केले. तर बँकेच्या CSR फंडातून शाळेला या वेळी प्रोजेक्टर देण्याबाबत आश्वासित केले. मनीषा मुसळे यांनी शाळेत वेगवेगळे उपक्रम, मुलांची प्रगती आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे असे मनोगत मांडले. या कार्यक्रमातील उत्साह, आनंद आणि एकात्मता पाहून, आपण असे म्हणू शकतो, की शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्याला हा दिवस उज्ज्वल करणारा ठरू शकतो.
सदर कार्यक्रमात सचिन कुमार IDBI बँक मॅनेजर, मनिषा मुसळे विस्तार अधिकारी सांख्यिकी, पत्रकार राम भोस्तेकर, गावकी अध्यक्ष रघुनाथ बेंदुगडे, शा. व्य. समिती अध्यक्ष कल्पेश पिसाळ, माजी उपसरपंच नाडकर, विजय बाळ अंधेरे, समिर अंधेरे, सिद्धेश शिगवण, मनाक्षी टेंबे, शरद मोरे, गोपाळ नाडकर, स्वाती आवाद, नरेश नाडकर, नरेश ढमाल, शंकर जांबरे, अंगणवाडी जांबरे, मदतनीस तेजस्विनी भोईर, श्रद्धा शिर्के, मोहिनी शेडगे, राजेंद्र बेंद्रे तसेच रेपोली गावातील आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शाळेच्या आवारात विद्यार्थी व प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक रत्नाकर महाले, तसेच सहशिक्षक संध्या जायभाये, सुनिल गोरेगावकर, जीवन तोरमल यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रस्तावना आभार प्रदर्शन सुनिल गोरेगावकर यांनी केले.




































