पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १ –जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला येऊन पोचला आहे. तालुक्यातील गोरेगाव जिल्हा परिषद गटात येणाऱ्या मौजे लोणेरे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पार पडले.
यावेळी गोरेगाव जिल्हा परिषद गट शिवसेना उमेदवार नरेश आयरे, महिला द. रायगड जिल्हा प्रमुख स्विटी गिरासे, वंचित बहुजन आघाडी माणगाव तालुका अध्यक्ष रोहन साळवी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ४८ गोरेगाव जिल्हा परिषद गटातून नरेश रामा अहिरे, लोणेरे पंचायत समिती गणातून प्रभाकर रामचंद्र ढेपे हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत.
यावेळी उमेदवार नरेश आयरे म्हणाले की, गोरेगाव जिल्हा परिषद गटात शिवसेना पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. काही लोकांना असं वाटत होतं शिवसेना उबाठा हा खरा पक्ष रायगड जिल्ह्यात तसेच गोरेगाव विभागात संपुष्टात आलेला आहे. पण त्यांचा हा गैरसमज आहे. प्रचारावेळी अनेक ठिकाणी शिवसेना पक्षाला पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादीच्या संघटिका प्रणाली सत्वे यांनी शिवसेना पक्षावर विश्वास दाखवत पक्षात पक्ष प्रवेश केला आहे. समाजातील वंचित बहुजन आघाडी सहित अनेक घटकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही युवा -महिला सक्षमीकरण, क्रीडा संकुल व खेळाडू कौशल्य विकसित करणे, सौरदिवे व सीसीटीव्ही प्रकल्प, शुध्द पाण्याची पाणी, आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना इत्यादी मुद्द्यावर ही निवडणूक लढवित आहोत. विकासकामे करणे व जनतेला सुख सुविधा देणे हेच ध्येय पुढे ठेवत निवडणुकीला सामोरे जात आहोत.
यावेळी वंचित बहुजन आघाडी माणगाव तालुकाध्यक्ष रोहन साळवी म्हणाले की, रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठी आहे. विकासकामे करणाऱ्यांना आम्ही प्राधान्य देत असून गोरेगाव जिल्हा परिषद गटातील सर्व शिवसेना उमेदवारांना आमच्या पक्षाकडून जाहीर पाठिंबा देत आहोत.




































