पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १- साहित्यरत्न लोकशाहीर मातंग समाजाचे आराध्य दैवत अण्णा भाऊ साठे यांची १०५ वी जयंती माणगाव बसस्थानकात गोरगरीब सामजिक विकास मंडळ माणगाव यांच्याकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गोरगरिब सामजिक विकास मंडळ माणगाव अध्यक्ष वसंत जाधव, उपाध्यक्ष संतोष माने, खजिनदार रामजी लोणके, सचिव अल्पेश पोवळे, उपखजिनदार संदेश लाड, सहसचिव तानाजी उडानशिवे, सल्लागार धनाजी उडानशिवे व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माणगाव बसस्थानकातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सह महात्मे डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी गोरगरिब सामजिक विकास मंडळ माणगाव सदस्यांकडून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा विजय असो, लहुजी साळवे यांचा विजय असो, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी माणगाव बसस्थानक परिसर दुमदुमून गेला होता. अशा प्रकारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती माणगाव शहरात मोठ्या उत्साहात पार पडली.



































