पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २२- भारतीय स्वातंत्र्योत्तर काळापासून इतिहास असलेल्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाला अनेक दशकांचा पुरोगामी विचारांचा वारसा लाभला आहे. रायगड जिल्ह्यात होणाऱ्या आगामी ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने पक्षाने अनेक मोठे संघटनात्मक बदल करण्यात येत आहेत यालाच अनुसरून २२ सप्टेंबर रोजी माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वसाधारण सभेत शेकाप सरचिटणीस मा.आ.जयंत पाटील यांच्या आदेशाने शेकाप जे जुने जाणते आणि एकनिष्ठ कार्यकर्ते सुरव तर्फे तळे चे माजी सरपंच आणि खरवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी व सुभाष सोसायटी खरवली चे संचालक सखाराम जाधव यांची शेतकरी कामगार पक्षाच्या माणगाव तालुका चिटणीस पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवड सभेला शेकाप ज्येष्ठ नेते नानासाहेब सावंत, माजी समाज कल्याण सभापती अशोक गायकवाड, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य निजाम फोफलूनकर, राजेश कासारे, रावसाहेब महाडिक, मोर्बा विभाग जेष्ठ नेते हसनमिया बंदरकर, जेष्ठ नेते बाळकृष्ण (अण्णा) अंबूर्ले, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक स्वप्निल दसवते, शेकाप जेष्ठ सदस्य रमेश बक्कम, नितीन वाघमारे, दिलीप उतेकर, चंद्रकांत सत्त्वे, दिलीप गुगले, रामदास (बुवा) जाधव, तुकाराम शेलार, अनंत पाटील, सुभाष टेंबे, भारत पवार (सर) व माणगाव शेकाप विविध आघाड्यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना सखाराम जाधव म्हणाले की, मी काल ही शेकाप मध्ये होतो आजही शेकाप मध्ये आहे आणि उद्याही शेकापशीच एकनिष्ठ राहीन.शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा आणि सरचिटणीस भाई जयंत पाटील आणि पक्षनेतृत्व आणि पक्षातील सदस्यांनी माझ्यावर अजून एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडेन व पक्ष संघटना वाढीसाठी व पक्षसंघटना मजबूत आणि बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.












































