पोलीस प्रवाह न्युज
सिद्धनेर्ली, दि. १० –विद्या मंदिर सिद्धनेर्ली शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती (SMC) पुनर्गठन सभा अत्यंत उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात दिनांक १० ऑगस्ट रोजी पार पडली. या सभेस शाळेतील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सभेच्या सुरुवातीला जुन्या समितीने केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर नवीन शैक्षणिक वर्षासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष: दिपक रामचंद्र मेटील
उपाध्यक्ष: विवेक रमेश पोतदार
समिती सदस्य: वंदना विजय गुरव, कोमल दिगंबर पाटील, प्रवीण धोंडीराम कांबळे, तुकाराम कृष्णात पोवार, प्रियंका महेश मगदूम, दशरथ बाळासो घराळ, वैभव बाबूराव फडतरे, मारूती शिवाजी मगदूम, अनुराधा मिथुन लोहार, गणेश राघू हजारे, नरसिंह घराळ, आरती विकास मगदूम, सारिका संभाजी मोरे, स्नेहल सुरेश तांदळे, नंदिनी संपत कांबळे
विशेष प्रतिनिधी व पदसिद्ध सदस्य:
शिक्षण तज्ञ: दिपाली संतोष पाटील
शिक्षक प्रतिनिधी: पल्लवी गजानन परीट
अंगणवाडी सेविका: सुमन पाटील
सचिव/मुख्याध्यापक विद्या विनोद चव्हाण
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे शाळा, ग्रामस्थ आणि पालक वर्गाकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.













































