पोलीस प्रवाह न्युज
पिंपरी-चिंचवड, दि. ८- तुकाराम नगर परिसरात मागील अनेक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुऱ्या वेळेत पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आधीच दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना पूर्वी सुमारे चार तास पाणी सोडले जात होते. मात्र आता केवळ एक ते दीड तास आणि अत्यंत कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने नागरिकांच्या घरातील पाण्याच्या टाक्याही पूर्ण भरत नाहीत.
या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेण्याची मागणी करत युवा सेनेचे पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुख संतोष म्हात्रे यांनी महापौरांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. तसेच महानगरपालिका आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाकडेही लेखी पत्र देऊन ते अधिकृतपणे इनवर्ड करण्यात आले आहे.
पाऊस चांगला झालेला असतानाही आणि धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असतानाही नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याबाबत संतोष म्हात्रे यांनी प्रशासनाच्या पाणीपुरवठा नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. Yabeli विभाग प्रमुख राजू भाऊ आवळे उपस्थित होते
संत तुकाराम नगरमधील नागरिकांना पूर्ण दाबाने *किमान चार तास नियमितnपाणीपुरवठा मिळाला पाहिजे. नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजांसाठी टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने तातडीने हा प्रश्न सोडवावा,” अशी मागणी संतोष म्हात्रे यांनी केली.
तसेच, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास युवा सेनेच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. “नागरिकांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत युवा सेना शांत बसणार नाही,” असा निर्धार संतोष म्हात्रे यांनी व्यक्त केला











































