पोलीस प्रवाह न्यूज
शृंखला संस्थेकडून कोकणी तानाबानाच्या प्रकल्पाची दखल
माणगाव : दि. १६ – कोकणात महिलांना घेऊन उभे केलेल्या कामासाठी अमिता मिशी यांची ड्रीमव्हीवर वूमन अवॉर्ड २०२५ साठी निवड झाली आहे. रायगडच्या दूरदूरच्या भागांमध्ये, जिथे शांततेच्या आड खंबीरतेच्या कथा दडलेल्या असतात, तिथे अमिता यांच्या सारखे परिवर्तन घडवणारे लोक आपल्या निष्ठावान प्रयत्नांनी मार्ग प्रकाशित करतात. मागील १० महिन्याच्या प्रयत्नांमुळे माणगावमधील, दहिवली येथील महिलांनी एकत्र येऊन कापडी पिशव्या शिवण्याचा उद्योग प्रकल्प सुरु केला आहे. मुंबई, पुणे, माणगाव व महाड येथे कापडी पिशव्याला चांगली मागणी आहे. अनेक दुकानदार आपल्या व्यवसायाची जाहिरात पिशवीवर करून लोकांपर्यंत पोहोचविण्याची नवीन पद्धत अवलंबत आहेत. प्लॅस्टिक पिशव्यांच्या बदल्यात आपण कापडी पिशव्यांचा पर्याय देतोय याचे शासकीय, राजकीय व जनमानसामध्ये कौतुकाने स्वागत होत आहे.
आतापर्यंत कोकणी तानाबानाच्या २२ महिलांनी ६४०० पिशव्या शिवून विक्री केल्या आहेत व एकूण ३०,००० रुपये उत्पन्न महिलांनी मिळविले आहे. अनेक बचत गटांच्या महिलांनी दहिवली सेंटर ला भेट देऊन उद्योग समूह उभे करण्याचा मानस बोलवून दाखवला आहे. शृंखला संस्थेच्या प्रमुख माननीय अस्मिता शर्मा यांनी कोकणी तानाबाना सेंटरला भेट देऊन महिलांचे अनुभव व अमिता यांची मुलाखत घेतल्यानंतर निवड समितीला अहवाल सादर केल्यानंतर या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे कळविले.शृंखला संस्थेकडून कोकणी तानाबानाच्या प्रकल्पाची दखल घेऊन उभे केलेल्या कामासाठी अमिता मिशी यांची ड्रीमव्हीवर वूमन अवॉर्ड २०२५ साठी निवड झाली आहे. रायगडच्या दूरदूरच्या भागांमध्ये, जिथे शांततेच्या आड खंबीरतेच्या कथा दडलेल्या असतात, तिथे अमिता सारखे परिवर्तन घडवणारे लोक आपल्या निष्ठावान प्रयत्नांनी मार्ग प्रकाशित करतात. मागील १० महिन्याच्या प्रयत्नांमुळे दहिवली, माणगावमधील महिलांनी एकत्र येऊन कापडी पिशव्या शिवण्याचा उद्योग प्रकल्प सुरु केला आहे. मुंबई, पुणे, माणगाव व महाड येथे कापडी पिशव्याला चांगली मागणी आहे. अनेक दुकानदार आपल्या व्यवसायाची जाहिरात पिशवीवर करून लोकांपर्यंत पोहोचविण्याची नवीन पद्धत अवलंबत आहेत. प्लॅस्टिक पिशव्यांच्या बदल्यात आपण कापडी पिशव्यांचा पर्याय देतोय याचे शासकीय, राजकीय व जनमानसामध्ये कौतुकाने स्वागत होत आहे. आतापर्यंत कोकणी तानाबानाच्या २२ महिलांनी ६४०० पिशव्या शिवून विक्री केल्या आहेत व एकूण ३०,००० रुपये उत्पन्न महिलांनी मिळविले आहे. अनेक बचत गटांच्या महिलांनी दहिवली सेंटर ला भेट देऊन उद्योग समूह उभे करण्याचा मानस बोलवून दाखवला आहे. शृंखला संस्थेच्या प्रमुख माननीय अस्मिता शर्मा यांनी कोकणी तानाबाना सेंटरला भेट देऊन महिलांचे अनुभव व अमिता यांची मुलाखत घेतल्यानंतर निवड समितीला अहवाल सादर केल्यानंतर या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे कळविले.




































