पोलिस प्रवाह न्युज
माणगाव – दि. ११– मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे मालिका सत्र सुरूच आहे. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर येथील डायव्हरजन जवळ आयशर टेम्पो व छोटा हत्ती टेम्पोत अपघात होऊन ८ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ११ मे रोजी सकाळी ५.३० वा. च्या सुमारास आरोपी नरेंद्रसिंग रजपूत, वय ३० वर्ष यांने त्यांचे ताब्यातील आयशर टेम्पो क्र. जी.जे. १८ बी. व्ही ७१५१ हा गोवा बाजुकडुन मुंबई बाजुकडे चालवित जात असतान मौजे इंदापूर येथील महामार्गावर असलेल्या डयव्हरशन ने न वळता सरळ जाऊन मुंबई बाजुकडुन येणा-या छोटा हत्ती टेम्पो क्र. एम. एच ४७ ए. एस ५८८९ ला समोरुन धडक देऊन अपघात केला. या अपघातात ८ जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. फडताडे करीत आहेत.



































